आपला जिल्हा
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

जालना/असलम कुरेशी
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते बुधवार दि.17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता हुतात्मा स्मारक, जालना येथे होणार आहे.
तत्पुर्वी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. तरी सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था आदि कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोशाखासह ध्वजारोहणास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

