रांजणी पं.स. गणातून मोईन तांबोळी निवडणूक रिंगणात उतरणार

रांजणी/असलम कुरेशी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर लक्ष केंद्रित केले आहे. रांजणी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) कडून मोईन तांबोळी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.
मोईन तांबोळी हे माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांचे कट्टर समर्थक असून 2019 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडिया प्रमुख पदावर कार्यरत आहेत. तसेच युवकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. मोईन तांबोळी विविध राजकिय व सामाजिक कार्यातही सक्रिय असून युवक वर्गात त्यांचा दांडगा संपर्क आहे. मागील निवडणूकात रांजणी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. मात्र पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार विजयी झालेला आहे. रांजणीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला समजले जाते. त्यामुळे रांजणी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निश्चित विजयी होणार असून पक्षाने उमेदवारी दिल्यास युवकासह समाजाच्या प्रत्येक घटकाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे मोईन तांबोळी यांनी सांगितले.
