
रांजणी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत शनिवारी नवीन शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विविध शैक्षणिक विषयावर चर्चा करून शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा निर्धार करण्यात आला.
रांजणी येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील अनेक शिक्षकांची बदली झाली असून शाळेला लगेच नवीन शिक्षकही मिळाले. शनिवारी रांजणी ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने नवीन शिक्षक अतहर शरीफ, मोहम्मद अनिस, निहाल अन्सारी, माजेद सिद्दीकी, शेख नवाज़, अंजुम शेख, नाहीद शेख आदींचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच शेख रहीम होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इरफान तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य इरफान कुरेशी, सय्यद मक्सुद अली, आझाद जर्नलिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी, अकील शाह, इब्राहिम तांबोळी, फेरोज़ पठाण, शोएब काझी, इम्रान कुरेशी, इलियास कुरेशी, फारुख बागवान, सिराज शाह, संजय मांडवे आदी उपस्थित होते.

