हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

रमज़ान महिन्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी

रांजणी/असलम कुरेशी

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील सकल मुस्लीम युवकांच्या वतीने पवित्र रमजान महिन्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये, अशी मागणी येथील वीज वितरण कार्यालयामार्फत कार्यकारी अभियंता जालना, उपकार्यकारी अभियंता घनसावंगी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रमजान महिन्यात सहरी व इफ्तारच्या वेळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ देखभाल व दुरुस्तीची (मेंटेनन्स) कामे पूर्ण करून सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. रमज़ान महिन्यात मुस्लिम बांधव रोज़ा, नमाज़, कुराण पठन व प्रार्थना आदी कामात व्यस्त असतात. त्यामुळे इफ्तार व सहरीच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सय्यद मकसूद, अख्तर अली, सोहेल सय्यद, कौसर शेख, नविद तांबोळी, अरबाज अतार, बशीर कुरेशी, रिज़वान बागवान आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker