नागरिकांनी थंडीच्या दिवसात योग्य ती दक्षता घ्यावी-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना/असलम कुरेशी
कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात दि. 17 ते 18 नोव्हेंबर 2025 रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. या दोन दिवशी तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तरी जालना जिल्ह्यातील नागरिकांनी थंडीच्या दिवसात योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
जिल्ह्यात लाट येण्याची शक्यता असल्याने काय करावे व काय करू नये याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. 1. आवश्यकता असल्यास घराबाहेर जावे अन्यथा घरीच थांबावे. 2. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे आहेत याची खात्री करावी. 3. प्रसार माध्यमाव्दारे वेळोवेळी थंडीचा प्रतिकार करण्यासाठी दिलेली माहिती किंवा सूचना अमलात आण्याव्यात. 4. एकटे राहणाऱ्या वयोवृद्ध शेजारच्या व्यक्तींकडे लक्ष दयावे. 5. गरम राहणाऱ्या किंवा इमारतीमधील जास्त हवा न येणाऱ्या खोलीमध्ये वास्तव्य करावे. रूम हिटरचा वापर करावा. गरम पेय घ्यावे व शरीर उष्ण राहण्यासाठी व थंडीच्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी शरीराला तयार करावे. 6. विदयुत प्रवाह खंडीत झाल्यास फ्रीज मधील खाण्याचे पदार्थ 48 तास व्यवस्थित राहू शकतात फक्त त्याचा दरवाजा व्यवस्थीत लागतो का ते पहावे व जास्त वेळा उघडू नये. 7. थंडी पासून बचाव करण्यासाठी टोपी किंवा मफलरचा वापर करावा. 8. रॉकेलचं स्टोव्ह किंवा कोळश्याची शेगडी वापरत असाल तर त्याचा धूर जाण्यासाठी खिडकी उघडी असावी अन्यथा दुषित धुरामुळे बाधा होऊ शकते. 9. ताजे पदार्थ खावेत ज्यामुळे शरीरामध्ये उर्जा निर्माण होईल. मादक पदार्थ किंवा अल्कोहोल मिश्रित नसलेले पेय घ्यावेत. 10 हिमबाधा झाल्याचे लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटावे. स्पर्श केल्यानंतर जाणीव होत नसल्यास किंवा हाताची बोटे, कानाची पाळी, नाकाचा शेंडा यांचा रंग पांढरा किंवा फिक्कट झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
खालील लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे
शरीर थंड पडणे. थंडी वाजणे. स्मृतीभ्रंश होणे. बोलतांना विसंगती किंवा अडखळणे, उच्चार स्पष्ट न करता येणे. अंधारी येणे, थकवा जाणवणे.

