हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

नवनियुक्त पोलीस पाटलांनी जातीयतेत दुभंगलेला समाज एकत्र सांधण्याची गरज-विनायक चोथे

घनसावंगी/असलम कुरेशी
आज सामाजिक परिस्थिती अत्यंत विस्कटलेली असून गावागावात समाज जातीययेत दुभांगला असून हा समाज एकत्र सांधण्याकरिता नवनियुक्त पोलीस पाटलांनी विशेष कार्य करावे असे प्रतिपादन स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विनायक चोथे यांनी संत रामदास महाविद्यालय घनसावंगी येथे आयोजित अंबड घनसावंगी तालुक्यातील नवनियुक्त पोलीस पाटील यांच्या सत्कार समारंभ प्रसगी केले.
यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत दिलपाक, विलास आर्दड, इलियास बागवान, अंकुश घोलप, इंद्रजीत खरात, सुनील शिंदे, जगन दुर्गे, राज देशमुख, शिवाजीराव गाडेकर, रमेश तारक, शंकरराव बेंद्रे, प्राचार्य डॉ. राजेंद्र परदेशी आदी उपस्थित होते. याप्रसंगी चंद्रकांत दिलपाक, इलियास बागवान व जगन दुर्गे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. परदेशी यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका डॉ. शशिकांत पाटील यांनी विषद केली तर सूत्रसंचालन डॉ. मारोती घुगे व आभार डॉ. प्रशांत सोनवणे यांनी मानले.
श्री चोथे पुढे बोलतांना म्हणाले की, आज ज्या पोलीस पाटलांच्या नियुक्त्या झाल्या त्या जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या अथक प्रयत्नातून निष्पक्षपणे झालेल्या आहेत. गावातील उच्च शिक्षित तरुणांना त्यांच्या बुद्धीच्या क्षमतेवर निवड झाली असून यामुळे आपण गावातील अन्यायग्रस्त घटकांना न्याय देण्याचे कार्य नैतिकतेने केले पाहिजे. गावात सर्वात जास्त व्यसन दारूचे असल्याने दारू बंदी करिता पुढाकार घ्यावा, शिवाय गावात मुलीच्या होणाऱ्या छेडछाडीस प्रतिबंद घालावा. याचप्रमाणे गावातील जाती-धर्म भेद नष्ट करण्यावर लक्षणीय उपाययोजना कराव्यात. ज्यामुळे या राज्याला देशाला लागलेले जातीवादाचे भेरूड थांबता येईल.
यावेळी नवनियुक्त पोलीस पाटलांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यात उमेश मापारी वाळकेश्वर, पवन बरडे टाका, सोनी टापरे ताडहादगाव, रवी बायस सोनकपिंपळगाव, सोपान शिंदे शहापूर, श्रीकांत शिंदे शहागड, राहुल आटोळे सौंदलगाव, शिवाजी हिवराळे रेणापुरी, रहीम शेख रोहिलागड, अर्जुन ठोंबरे रामगव्हाण, अमोल पवार राहुवाडी, महादेव पांढरे पी. शिरसगाव, शुभम गायकवाड पिंपरखेड, हरिभाऊ विटोरे पाथरवाला, रामेश्वर जाधव पावसे पांगरी, पागीरे ज्ञा‌नेश्वर पागीरवाडी, अनुसया साबळे लेंभेवाडी, गुळवणे ज्ञा‌नेश्वर कोठाळा, राणी धुमक करंजळा, जाधव शिवाजी जामखेड, चव्हाण राजू ईश्वरनगर, लांडे अमोल इंदलगाव, रोहित राठोड गोविंदपूर, निवास येटाळे गोरी, भिगारदेव महेंद्र गोला, चव्हाण आकाश गंगारामवाडी, अमोल जायभाये दुनगाव, सय्यद अमीर धाकलगाव, गायकवाड आकाश डावरगाव, स्वाती खंदारे दहिगव्हाण, विलास लांडगे दाढेगाव, अतुल मुळे चिंचखेड, इराण शेख बोरी, प्रल्हाद सांगडे भार्डी, चौधरी गोरक्ष बळेगाव, नम्रता तारख सराटी अंतरवाली, बाबू घुले शिराढोणवाडी, अर्जुन जाधव वसंतनगर, गणेश गायकवाड वालखेडा, बगाटे वैभव शिरणेर, कुलकर्णी विश्वंभर पराडा, धनंजय लिहिणार काटखेडा, जगदीश पवार कर्जत, सय्यद अन्सार झिरपी, राधा नरवडे हस्तपोखरी, गारुळे ज्ञा‌नेश्वर दह्याळा, निकिता बनकर चंदनापुरी, राहुल कनके भांबेरी, शिवकन्या जारे बठाण, हरिभाऊ लहामगे बनटाकळी आदी अंबड तालुक्यातील तर घनसावंगी तालुक्यातील निता उन्हाळे यावलपिंप्री, राठोड राहुल यावलपिंप्री तांडा, वर्षा दाभाडे उक्कडगाव, परमेश्वर खरात सी. पिंपळगाव, राजश्री शिंदे श्रीपत धामणगाव, विष्णू सावळे शिंदेवडगाव, विक्रम राऊत शिंदखेड, संदीपान वाघमारे शेवता, पडेवार विजयालक्ष्मी साकळगाव, पवार भीमा रवना, शारदा सरकटे रामसगाव, शिल्पा वाहुळे रामगव्हाण, सुरज पाटोळे रांजणीवाडी, करण लोंढे राजेगाव, पांडुरंग मांडवे रांजणी, कोरडे दादासाहेब राहेरा, महिदा शेख पिरगैबवाडी, राऊत हनुमंत मुद्रेगाव, कोकणे संतोष मंगू जळगाव, मोहन खरात मंगरूळ, भोसले नामदेव माहेरजवळा, सोनवणे किशोर मांदळा, काळे आकाश लिंबोनी, तौर अविनाश लिंबी, राहुल राठोड लमाणवाडी, जम्मू शेख कु. पिंपळगाव, पांढरे त्रिंबक कोठी, सानिया शेख खडकावाडी, जावेदखा पठाण करडगाव, सतीश उढाण कंडारी अ., तुळशा चव्हाण हातडी, पंकज खंडागळे गुरुपिंप्री, निवास चव्हाण गुणानाईक तांडा, मंगेश टेहळे घोन्सी बु. सुदर्शन गाढेकर देवी दहेगाव, एजाज शेख दहीगव्हाण बु, माठे अयोध्या चित्रवडगाव, आनंद हिवाळे शेवगळ, कोळे विशाल बोरगाव खु. भाग्यश्री मगर बोररांजणी, मोरे विलास बोधलापुरी, चिमणकर प्रल्हाद भुतेगांव, बबन पानखडे भोगगाव, सुरासे किशोर भेंडाळा, महावीर सोनवणे भद्रेगाव, सिराज शेख बानेगाव, बन्सी पवार बहीरगाव, पूजा निंबाळकर अरगडे गव्हाण अशोक पवार टेंभी अंतरवाली, वर्षा रोहिमल अंतरवाली राठी व महादेव बरसाले अंतरवाली दाई आदींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker