छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न

घनसावंगी/असलम कुरेशी
तालुका घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव महसूल मंडळात शनिवारी महसूल विभागा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा १ हे नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात उत्साहात संपन्न झाले.
शिबिरास तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारून नागरिकांना प्रत्यक्ष सेवेचा लाभ दिला. यावेळी तहसीलदार रमेश पागोटे, नायब तहसीलदार संतोष इथापे, सोमनाथ तोतला, मोनाली सोनवणे, उपअधीक्षक भूमिअभिलेख बिदरकर, दुय्यम निबंधक मनीषा पैठणे, मंडळ अधिकारी प्रविण गजरे, ज्ञानेश्वर चौरे, ग्राम महसूल अधिकारी महेंद्र साळवे, एनएम येवतीवाड, भरत बारसे, गंगाधर जाधव, मंडळ कृषी अधिकारी श्री लोंढे, सहायक कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी श्री खोडदे, आरोग्य अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी आदिसह मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या अभियानात एकूण १३८९ नागरिकांना लाभ देण्यात आले. तहसीलदार श्री पागोटे यांनी शिबिराबाबत सविस्तर माहिती दिली. श्रीमती मोनाली सोनवणे यांनी आभार मानले.



