हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

जालना/असलम कुरेशी
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणिकरण करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी दि.18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तरी महिलांना विविध अडचणींना सामोरे जावे लागल्याने ई-केवायसी करण्यास आता दि.31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी पात्र लाभार्थी महिलांनी पडताळणी आणि प्रमाणिकरण करण्यासाठी ई-केवायसी वेळेत करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker