रांजणी येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

रांजणी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे बुधवारी नागसेन बौद्ध विहार आण्णाभाऊ साठे पुतळा व ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी भारतीय संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. 26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सरपंच अमोलभाऊ देशमुख, उपसरपंच शेख रहिम, मुख्याध्यापक मारोती पाटोळे, विजयकुमार खुळे, पोलिस पाटील पांडूरंग मांडवे, ग्रामपंचायत सदस्य सय्यद मक्सुद अली, सुदाम पवार, शिवाजी पाटोळे, श्रीमंत जाधव, सोना साळवे, कैलास जाधव, लक्ष्मण पाटोळे, भारत कोळे, राहुल जाधव, अशोक जाधव, किरण जाधव, संतोष गोसावी, किरण देशमुख, मसरत काझी, छाया हलगे, निर्मला देशपांडे, राधा जाधव, वंदना कपाळे, शबाना काझी, लता वरखडे, अनुसया शिंदे, मंगल देवकर आदी उपस्थित होते.

