विरेगाव परिसरातील ४० पुरग्रस्त कुटूंबांना किराणा साहित्य वाटप

विरेगाव/प्रतिनिधी
जालना तालुक्यातील विरेगाव, धानोरा, हस्तेपिंपळगाव येथील पुरग्रस्त कुटूंबांना ग्रामपंचायत कार्यालयात किराणा साहित्याचे उद्योजक गणेश श्रीपतराव जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
विरेगाव जवळील कल्याणी व गिरजा नदीला पाच दिवसापूर्वी पुर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरुन संसारोपयोगी साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेती पिकात पाणी शिरुन जमीन घासून मोठ्या प्रमाणात भाजीपाला कपाशी, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून उद्योजक गणेश जाधव यांच्या पर्यतनातून विरेगाव, धानोरा, हस्ते पिंपळगाव येथील गावात जाऊन किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सुरेश जाधव, श्रीपतराव जाधव, कैलास कदम, मधुकर मोठे, गणेश कदम, अर्जुन मोठे, गणेश शिंदे, अमोल जाधव आदी उपस्थित होते.

