गंगापूर येथे शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

गंगापूर/प्रा संजय तुपे
रा मा धुत कन्या माध्यमिक विद्यालय गंगापूर येथे शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख विजय तुपे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री साहेब अध्यक्ष रामा धूत कन्या माध्यमिक विद्यालय गंगापूर तसेच मुख्याध्यापिका श्रीमती बेंद्रे मॅडम आणि पर्यवेक्षिका श्रीमती शास्त्री मॅडम ह्या होत्या.
अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यानंतर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शिक्षण परिषदेच्या विषयवार शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. अध्ययन स्तर निश्चिती बाबत श्रीमती शितल जाधव यांनी मार्गदर्शन केले तर सर्वेक्षणाबाबत श्री नवनाथ भोळे सर यांनी मार्गदर्शन केले. लोकसहभाग कशा पद्धतीने मिळवा याबाबत श्री एमपी लगड यांनी स्व अनुभव सांगून विशेष मार्गदर्शन केले. गंगापूर केंद्रात बदलीने आलेले नवीन शिक्षक यांचे सर्वांचे शाल आणि श्रीफळ देऊन केंद्रप्रमुख विजय तुपे यांनी स्वागत केले. सर्व शिक्षकात चांगले गुण असतात, व्यासंग असतो या सर्वांचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना करावा असे कळकळीचे आवाहन विजय तुपे यांनी केले. तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गंगापूर नंबर दोन येथील श्रीमती ज्योती पुंड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले. यामध्ये विविध कवींच्या कवितांचा आनंद देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती वंदना साळवे, स्वाती इखे डॉ पल्लवी फडतर, श्री सुपडू चौधरी, श्री रावसाहेब शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी केंद्रातील अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित शाळेतील वर्ग एक ते आठला अध्यापन करणारे शिक्षक-शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती. शिक्षण परिषद ही यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अभिषेक शहाणे, नवनाथ भोळे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी सुनील जाधव, संतोष आळंजकर, संपत शिंदे, प्रदीप साळवे, कैलास सूर्यवंशी, श्रीमती स्मिता साबळे, श्रीमती संगीता ननावरे, श्री सचिन पाठक, श्रीमती गीतांजली बोडखे, श्री दत्ता आडेप, श्री नानासाहेब सावंत, श्री ज्ञानेश्वर आंधळे यांनी सर्वांनी शिक्षण परिषद यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले.
शेवटी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम श्रीमती स्वाती इखे मॅडम यांनी केला. केंद्रप्रमुख विजय तुपे यांनी परिषदेमध्ये दशसूत्री अंतर्गत महिला जागर कार्यक्रमासाठी सर्व महिलांनी उपस्थित राहण्याबाबत मुख्याध्यापकांना सूचना केल्या. तसेच आमदार प्रशांत बंब यांच्या संकल्पनेतून फोनिक इन मराठी प्रशिक्षणार्थीची यादी तयार करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आली. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी जे काही प्रशासकीय मुद्दे दिले होते ते पण सर्व शिक्षकांना सांगण्यात आले.

