आपला जिल्हा
राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी आण्णासाहेब देशमुख

जालना/असलम कुरेशी
राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या प्राथमिक विभागाच्या जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी आण्णासाहेब देशमुख यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष उध्दव एकनाथराव पवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या प्राथमिक विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदी आण्णासाहेब शिवराम देशमुख, जिल्हा मार्गदर्शक पदी शांतीलाल खरात, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी चंद्रकांत हजारे, जिल्हा संघटक पदी आदम मुबारक शेख यांची पुढील आदेशापर्यंत नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

