दिपावली निमित्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोनस व मिठाई वाटप

रांजणी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी ग्रामपंचायतच्या वतीने दिपावली निमित्त गावाची सेवा करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोनस व मिठाई वाटप करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच अमोलभाऊ देशमुख म्हणाले की गावाच्या विकास कामात ग्रामपंचायत कर्मचारी नेहमीच सक्रिय असतात. विकास कामात त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी रांजणी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना दरवर्षी बोनस व मिठाई वाटप करण्यात येते. यावेळी सरपंच अमोलभाऊ देशमुख, उपसरपंच शेख रहिम, ग्रामपंचायत सदस्य कैलास वरखडे, विजयकुमार खुळे, बंडू गाढे, शेख वसिम, अनिल लगामे, पोलिस पाटील पांडुरंग मांडवे, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष गोसावी, रंगनाथ निकम, नानाभाऊ पाटोळे, किरण देशमुख, पांडूरंग पाटोळे, सहदेव लगामे, परमेश्वर जाधव, रामेश्वर इंगळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.

