हि बातमी ईतर भाषेत वाचा
जाहिरात पुरस्कृत बातमी

एक प्रेरणादायी सामाजिक व राजकीय नेता अमोलभाऊ देशमुख

रांजणी गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढणार

रांजणी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या गटात इच्छुक उमेदवारांनी निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. रांजणी गटातून जिल्हा परिषदेसाठी विद्यमान सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार गट) अमोलभाऊ देशमुख यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास जिल्हा परिषद निवडणूकीत विजयी होऊन रांजणी सर्कलचा सर्वांगिण विकास करण्यासाठी कटिबध्द असल्याचे अमोलभाऊ देशमुख यांनी सांगितले.
प्रारंभिक जीवन व शिक्षण
अमोलभाऊ गोपाळराव देशमुख यांचा जन्म १ मार्च १९८५ रोजी जालना जिल्ह्यातील रांजणी (ता. घनसावंगी) या लहानशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रांजणी येथील श्री सरस्वती भुवन शाळेत झाले. उच्च शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थी चळवळीत सक्रीय सहभाग घेतला आणि समाजातील प्रश्नांकडे लक्ष वेधत सामाजिक कार्याची सुरुवात केली.
सामाजिक कार्यातून राजकारणात प्रवेश
सर्वप्रथम २०१४ साली त्यांनी रांजणी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. या निवडणूकीत त्यांनी एकूण ९ उमेदवार उभे केले होते. त्यातील ५ उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटासोबत सहकार्यातून सत्तेत भाग घेतला. परंतु सत्तेचा उपयोग प्रतिष्ठेसाठी न करता, गावातील प्रत्येक घटकासाठी शेतकरी, गरीब, महिला, युवक यांच्यासाठी कार्य करण्यावर त्यांचा भर राहिला.
कृषी उत्पन्न बाजार समिती व पुढील यश
यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय मिळवून, त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती मालाच्या हमीभावासाठी प्रयत्न केले. व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व साठवणूक व्यवस्थापनात सुधारणा आणण्यासाठी भर दिला.
२०२० साली ग्रामपंचायत निवडणूकीत स्वतंत्र पॅनल घेऊन पुन्हा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. या निवडणुकीत १७ पैकी १५ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. हा विजय म्हणजे अमोलभाऊंच्या नेतृत्वावर जनतेनं ठाम विश्वास दर्शवला.
उल्लेखनीय कामगिरी-विहिरी व घरकुल योजना
सत्तेवर आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना केल्या. रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींची कामे मंजूर करून अनेक शेतकऱ्यांना दिलासा दिला. पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेतून शेकडो गरजूंना घरकुल मंजूर करून दिले. या योजनांमुळे ग्रामीण भागातील सामान्य जनतेचा अमोलभाऊ देशमुख यांच्यावर विश्वास वाढला.
विविध सन्मान व पुरस्कार
अमोलभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रांजणी ग्रामपंचायतीने अनेक पुरस्कार प्राप्त केले. यामध्ये स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार, लोकमत ग्रामविकास पुरस्कार, ग्रामसधन व स्वच्छता अभियानात उल्लेखनीय कामगिरी, अटल भूजल योजनेत जिल्हास्तरीय तिसरा क्रमांक पटकावला.
सर्वसमावेशक नेतृत्व
अमोलभाऊ देशमुख हे सर्व समाज, जात, धर्म आणि वर्ग यांच्या एकत्रित विकासासाठी सतत कार्यरत आहेत. गरजूंना टँकरने पाण्यासाठी मदत करणे, लग्नात आर्थिक हातभार लावणे अथवा संकटसमयी तातडीने धावून जाणे ही अमोलभाऊंची ओळख आहे.
पुढील वाटचाल–जिल्हा परिषद निवडणूक
संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातून एकच आवाज उठतोय “अमोलभाऊ जिल्हा परिषदेसाठी लढायलाच हवेत!” त्यांच्या पारदर्शक, विकासाभिमुख आणि जनतेच्या हक्कासाठी झगडणाऱ्या कार्यपद्धतीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जातो. अमोलभाऊ गोपाळराव देशमुख हे केवळ एक नेता नाहीत, ते समाजसेवक, शेतकऱ्यांचे आधारस्तंभ, तरुणांचे मार्गदर्शक आणि गावविकासाचे प्रतीक आहेत. त्यांची वाटचाल ही जनतेच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कर्तृत्वावर आधारित असून, पुढील स्तर गाठणे हे निश्चित आहे.
“रांजणी ते जिल्हा परिषदअमोल भाऊंचं काम बोलतंय!” “भाऊ, तुम्ही तयारीला लागा, जनता तुमच्या सोबत ठाम उभी आहे!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker