पोस्टाच्या डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम
जालना/असलम कुरेशी
छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये पीएलआय, आरपीएलआय मध्ये डिजिटल व्यवहारांचा प्रसार व मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम डाक विभागाच्यावतीने वर्ष 2025 च्या अखेरपर्यंत पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI) मध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे. तरी सर्व विमाधारकांनी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयात भेट देऊन संपर्क माहिती अद्ययावत करून डिजिटल व्यवहारांची सुविधा घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
पोस्टाच्या डिजीटल व्यवहार विशेष जनजागृती मोहीम उपक्रमाचा उद्देश ग्राहकांना सुलभ सेवा प्रदान करणे व व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवणे आहे. ग्राहकांना त्यांच्या पीएलआय, आरपीएलआय खात्यांमध्ये मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून हप्त्याची माहिती, पावत्या व इतर महत्वाच्या सूचना वेळेवर प्राप्त होऊ शकतील. डाक कर्मचारी ग्राहकांना संपर्क माहिती अद्ययावत करण्यात मदत करत आहेत तसेच डिजिटल पेमेंट करण्याबाबत मार्गदर्शनही करत आहेत. हा उपक्रम ग्राहक समाधानी सेवा व डिजिटल पोहोच वाढवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. असेही कळविले आहे.

