आपला जिल्हा
रांजणी येथे क्रांतीगुरू लहुजी साळवे यांची जयंती साजरी

रांजणी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ शुक्रवारी क्रांतीगुरू लहुजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच अमोलभाऊ देशमुख, उपसरपंच शेख रहिम, माजी सरपंच राधाकिसन जाधव, ग्रामपंचायत सदस्य भगवानसिंह जनकवार, कैलास वरखडे, शिवाजी पाटोळे, हरिभाऊ पाटोळे, लक्ष्मण पाटोळे, गोपिनाथ, सहदेव लगामे, सचिन पाटोळे, रंगनाथ निकम, विजयकुमार खुळे, भगवान पाटोळे, कैलास जाधव, अशोक पाटोळे, भारत कोळे आदी उपस्थित होते.

