राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारक पदी अॅड नाझेर काझी

जालना/असलम कुरेशी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अभ्यासू नेतृत्व व प्रखर वक्ते अॅड नाझेर काझी यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काझी यांची नुकतीच प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अल्पावधिच्या काळात मराठवाडा व खानदेश विभागाचा झंझावत पक्षीय दौरे करुन संघटनेत नवचैतन्य निर्माण करुन पक्षाला दिशा देवून धर्मनिरपेक्षतेची बीजे रोवली. काझी यांच्या या प्रशंसनीय कार्याची राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दखल घेवून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे.
सदरील नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी जारी केले आहे. स्टार प्रचारक अॅड नाझेर यांचे जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, कार्याध्यक्ष मिर्झा अन्वर बेग, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाह आलम खान, शिवराज जाधव, इम्रान बिल्डर, ज़हीर बिल्डर, शेख शोएब, शेख मुज़म्मील, सय्यद जावेद अली, इलियास मुसा, शेख उमेर, सय्यद आरेफ, आरेफ बागवान, गफ्फार बेग यांनी अभिनंदन केले आहे.



