पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावे–विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
छत्रपती संभाजीनगर/असलम कुरेशी
भारत निवडणूक आयोगाने दि.१२.०९.२०२५ रोजीच्या पत्रान्वये घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची जाहीर सूचना दिनांक ३०.०९.२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे.
मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने स्विकारण्याबाबत आयोगाच्या सूचना आहेत. परंतू विभागातील काही कार्यालयाकडून पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने न करता ऑनलाईन करण्यात यावेत असे सांगण्यात येत असल्याची तोंडी तक्रारी येत असल्यामुळे, पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावेत, याबाबतची सूचना जिल्हास्तरावरुन सर्व संबंधितांना निर्गमित करण्यात याव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.



