घनसावंगीच्या हाजी अब्दुल रज़्ज़ाक गुलाम रसूल उर्दू हायस्कूल येथे संविधान दिन उत्साहात साजरा

घनसावंगी/असलम कुरेशी
हाजी अब्दुल रज्जाक गुलाम रसूल उर्दू हायस्कूल घनसावंगी येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेच्या वाचनाने झाली. विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, मूलभूत अधिकार, कर्तव्ये तसेच लोकशाही मूल्यांविषयी उपयुक्त माहिती देण्यात आली.
याप्रसंगी मुख्याध्यापक गुलाम रब्बानी अब्दुल रशीद यांच्यासह रियाज अहमद अब्दुलरशीद, मतीन, अब्दुल कुद्दूस, अब्दुल अजीज आणि सादेक आदी शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधानातील तत्वांचे पालन करण्याचे, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याचे आणि जबाबदार नागरिक बनण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, भाषण, पोस्टर प्रस्तुतीकरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापन शाळेतील शिक्षकांनी उत्तम प्रकारे पार पाडले. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि अभिमानाची भावना दृढ झाली. संविधान दिनाचा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

