हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

रांजणीवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संगणक लॅबचे उद्घाटन

रांजणी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणीवाडी येथील ​जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात संगणक लॅबचे उद्घाटन लोकसहभाग ऋणनिर्देश सोहळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक विचारधारा व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विष्णू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. समस्त गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे शाळेला ही आधुनिक सुविधा प्राप्त झाली आहे.
यावेळी गटशिक्षणाधिकारी, घनसावंगी रवींद्र जोशी, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक सोळंके, केंद्रप्रमुख रंजीत डोळझाके, सरपंच अरुण मोरे, उपसरपंच भीमराव पाटोळे, ग्रामसेवक अनिल मांटे, माजी मुख्याध्यापक बाळू लंगुटे उपस्थित होते. कार्यक्रमात बन्सीभाऊ शेळके, ह.भ.प. बाळुराज महाराज शेळके, ह.भ.प. बळीराम महाराज यादव आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभू पाटोळे, उपाध्यक्ष अशोक जाधव, मुख्याध्यापक मिनाज कुरेशी, सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker