रांजणी येथे सद्भावना ईद मिलन संमेलन संपन्न

रांजणी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे जमाते इस्लामी हिंद शाखेच्या वतीने नुकतेच सद्भावना ईद मिलन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठनाने झाली. रिजवान कुरेशी यांनी दिव्य कुरआनचे पठण केले व तोफिक शेख यांनी त्याचे भाषांतर केले.
जमाते इस्लामी हिंदचे स्थानिक अध्यक्ष
महोसिन इकबाल यांनी प्रस्तावना व्यक्त करताना सांगितले की हा देश विविध धर्मांचा विविध जातींचा विविध वेशभूषांचा विविध राहणीमानांचा असा देश फुलांचा गुलदस्ता सारखा आहे. शांती समानता प्रेम बंधुत्व भारतात नांदते. सरपंच अमोलभाऊ देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शांती प्रेम बंधुत्व राहण्यासाठी जमाते इस्लामी हिंदच्या वतीने हा कार्यक्रम दरवर्षी व या सारखे विविध कार्यक्रम घेण्यात येतात. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अ. खालेक कुरेशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले देशात शांती नांदावी व लोकांमध्ये प्रेम बंधुत्व निर्माण व्हावा चांगल्या समाजाची निर्मिती व्हावी. त्यांनी जमाते इस्लामीच्या कामाचे कौतुक केले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार खुळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. श्रीराम गिरी महाराज हे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप करताना मौलाना अब्दुल वाजिद कादरी यांनी सांगितले की खुप काही प्रेरणा प्रेषित मोहम्मद पैगंबर व इस्लामच्या माध्यमातून दिली गेली. ईश्वराने प्रत्येक धर्मामध्ये मार्गदर्शनासाठी आपली इशवाणी या धरतीवर अवतरीत केली.
कुरान हा अंतिम संदेश ग्रंथ आहे. आम्हाला हा संदेश प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दिला की मानवाने माणसाची गुलामी सोडून ईश्वराची गुलामी मग्न व्हावे. तुमचे चांगले वाईट जे काही होत आहे या समाजामध्ये राहूनच होणार आहे. तुम्ही सत्यापर्यंत पोहोचले पाहिजे. सत्याचा शोध घेतला पाहिजे. त्यासाठी ईश्वराने तुम्हाला बुद्धी दिली, डोळे दिले. हमारे बाप दादा क्या करते थे वो नही. जो समाज का तरीका क्या है वो नही है. मै उसको कितना समझता हूँ. मुझे ईश्वर के सामने खडे होना है. अपने किये का हिसाब देना है. याला आपण म्हणतो तोच खरा धार्मिक मनुष्य आहे.
जो या गोष्टीवर आचरण करतो. शेवटी भारत वनगुजरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले जे इराण अमेरिका इजराइल युद्ध सुरू आहे. त्यासाठी सर्व पंथांच्या लोकांनी आपल्या माध्यमातून युद्ध लवकरात लवकर संपावे अशी प्रार्थना करावी. आभार प्रदर्शन रिजवान कुरेशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिराज तांबोळी,, तौफीक शेख, ज़हीर फारूकी ,वासिफ फारूकी, राफे अथर, सरफराज कुरेशी, एजाज तांबोळी, जकी अहमद, नईम फारूकी, सय्यद मकसुद, साजिद बागवान, मोईन बेग यांनी पारिश्रम घेतले.



