हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

जालना जिल्ह्यात उर्दू वाचन अभियान 3.0 मध्ये जावेद खान यांचा प्रथम क्रमांक

जालना/असलम कुरेशी
उर्दू वाचन अभियान 3.0 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय उर्दू परिसंवाद (Symposium) मध्ये Z.P. Urdu P.S. नांदी येथील शिक्षक जावेद खान यांनी “लोक सहभाग” या विषयावर सादर केलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
हा परिसंवाद Regional Academic Authority, छत्रपती संभाजीनगर व District Institute of Education and Training (DIET), जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता.
जावेद खान यांनी आपल्या सादरीकरणामध्ये शाळा, पालक, ग्रामस्थ व समाजातील विविध घटकांच्या सहभागातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण झाली याचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणात शाळेतील उपक्रम, वाचनालय विकास, पालक सभा, तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे ठोस पुरावे सादर करण्यात आले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जावेद खान यांचा सन्मान करण्यात आला असून, त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील उर्दू शाळांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker